Weather Report :  मुंबईत मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा 

Heavy rains in Mumbai and sparse rains in central Maharashtra शुक्रवार दि. 3 पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आह. मुंबई मध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे सकल ठिकाणी पाणी साचले होते.  

एमपीसी न्यूज – आरबीसमुद्रावरुन वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पाचा पुरवठा होणार आहे त्यामुळे शुक्रवार दि. 3 पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आह. मुंबई मध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे सकल ठिकाणी पाणी साचले होते.  

पुणे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य माराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.

कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊसाची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) (1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे

कोकण आणि गोवा : मालवण 20, दोडामार्ग, कणकवली 18 प्रत्येकी, मुळदे 17, कुडाळ 15, दाभोलीम (गोवा) 14, पेडणे, रत्नागिरी, वेंगुर्ला 13 प्रत्येकी, केपे 12, कानकोन 11, म्हापसा 10, राजापूर, सांगे 9 प्रत्येकी, रामेश्वर कृषी, वैभववाडी 8 प्रत्येकी , हर्णे, मार्मगोवा, मुंबई (कुलाबा), श्री वर्धन ६ प्रत्येकी, अलिबाग, मुरुड 5 प्रत्येकी, देवगड 4, बेलापूर (ठाणे), दापोली, कर्जत, लांजा 3 प्रत्येकी, भिर, गुहागर, खेड, रोहा, सावंतवाडी, ठाणे, वसई 2 प्रत्येकी, चिपळूण, डहाणू, जव्हार, महाड, मंडणगड, माणगांव, माथेरान, म्हसळा, पनवेल, संगमेश्वर देवरुख, सुधागड पाली, उरण, वाडा 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : गगनबावडा 7, आजारा, राधानगरी 4 प्रत्येकी, चाळीसगाव 3, चांदगड, गारगोटी  / भुदरगड, माल्रेगाव, पन्हाळा 2 प्रत्येकी, भोर, शाहुवाडी 1 प्रत्येकी.

मराठवाडा : कळमनुरी, माहूर 5 प्रत्येकी, सेलू 3, आष्टी, हदगाव, निलंगा, परतूर 2 प्रत्येकी, औसा, बीड, धर्मबाद, हिंगोली, किनवट, मंठा, परळी वैजनाथ, पाथरी, सेनगाव, उमरगा 1 प्रत्येकी.

विदर्भ : गडचिरोली, कळंब 4 प्रत्येकी , चंद्रपूर, हिंगणघाट, कामठी, रिसोद 3 प्रत्येकी, बाभुळगाव, चिमूर, देवळी, मालेगाव, नाग भीर, राळेगाव, समुद्रपूर, साओली, शिंदेवाही, तुमसर, वणी, वाशिम 2 प्रत्येकी, अहीरी, अमरावती, आर्मोरी, आर्णी, बार्शी टाकळी, देऊळगाव राजा, दिग्रस, एटापल्ली, गोंड पिपरी, हिंगणा, जिवती, कोरची, कुही, लोणार, महागाव, मनोरा, मेहकर, मुल, मुलचेरा, पारशिवनी, पोंभुर्णा, पुसद, वरोरा 1 प्रत्येकी.

घाटमाथा : कोयना (नवजा) 5 , इुंगरवाडी 3, ताम्हिणी 2, शिरगाव, वाणगाव, अम्बोणे, दावडी, भिवपुरी, कोयना (पोफळी), खोपोली 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

3 जुलै : कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

4 जुलै : कोंकण गोवा, मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

5 – 6 जुलै: कोंकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

 

इशारा :

 

3 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

4 – 5 जुलै : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.

पुण्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाट होऊन मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी मुसळधार  पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.