Thergaon Crime News : लग्नाचे आमिष देत ऑफिसमधील सहका-याकडून बलात्कार

एमपीसी न्यूज – एकाच ऑफिसमध्ये कामाला असलेल्या महिला सहका-याला जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलवले आणि लग्नाचे आमिष देऊन जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर वारंवार शारिरिक संबंध प्रास्थापित केले व लग्नास नकार देऊन फसवणूक केली आहे. मार्च 2020 ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत थेरगाव येथे हा प्रकार घडला.

याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सुधाकर पाटकर (वय 26, रा. थेरगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच ऑफिसमध्ये काम करतात त्यांची मैत्री होती. आरोपीने फिर्यादी यांना एक दिवस जेवण बनवून देण्यासाठी घरी बोलावले आणि लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर वारंवार इतर ठिकाणी घेउन जात शारिरीक संबंध प्रास्थापित केले. दुस-या मुलीशी लग्न केल्याचे सांगून आरोपीने लग्नास नकार दिला व मारहाण आणि शिवीगाळ करून शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.