World Corona Update: कोरोनाबाधितांची संख्या 43,42,345 तर मृतांचा आकडा 2,92,893 वर!

World Corona Update: Corona infected patients count rises to 43,42,345, death toll rises to 2,92,893

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाबाधितांच्या संख्येत काल अचानक लक्षणीय वाढ झाली. जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 43 लाख 42 हजार 345 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या 2 लाख 92 हजार 893 (6.75 टक्के) इतकी झाली आहे. आतापर्यंत 16 लाख 02 हजार 441 (37 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 24 लाख 47 हजार 011 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 24 लाख 669 म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 46 हजार 342 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. नवीन कोरोनाबाधित रुग्णांबरोबरच मृतांच्या संख्येतही लक्षणीय घट दिसून येत आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

6 मे – नवे रुग्ण 95 हजार 325  दिवसभरातील मृतांची संख्या 6 हजार 811
7 मे – नवे रुग्ण 96 हजार 262  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 589
8 मे – नवे रुग्ण 97 हजार 128  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 550
9 मे – नवे रुग्ण 88 हजार 997  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 248
10 मे – नवे रुग्ण 79 हजार 825 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 510
11 मे – नवे रुग्ण 74 हजार 228  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 403

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 14 लाखांच्या पुढे

अमेरिकेत मंगळवारी 1,630 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 83 हजार425 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 14 लाख 08 हजार 636 पर्यंत पोहचली आहे.

ब्राझीलमध्ये काल (मंगळवारी) 779, इंग्लंडमध्ये 627 तर फ्रान्समध्ये 348 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. इक्वाडोरमध्ये काल 182, स्पेन व कॅनडामध्ये प्रत्येकी 176, इटलीत 172, भारत 121, मेक्सिकोमध्ये 108, रशियात 107, पेरू 96 व जर्मनीत 77 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत रशिया तिसऱ्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत रशिया, ब्राझील, पेरू व चिली या देशांनी काल (मंगळवारी) वरचे स्थान मिळवले आहे. रशियाने इंग्लंडला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे. ब्राझीलने जर्मनीला मागे टाकत सातवे स्थान मिळविले आहे. जर्मनी आता आठव्या स्थानावर आहे. पेरूने कॅनडाला मागे टाकत 13 वे स्थान मिळविले आहे. कॅनडा आता 14 व्या क्रमांकावर आहे. भारत 12 व्या तर पाकिस्तान 19 स्थानावर कायम आहे. चिलीने Top-20 मध्ये प्रवेश केला असून स्वित्झर्लंड त्यातून बाहेर गेला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 14,08,636 (+22,802), मृत 83,425 (+1,630)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,69,520 (+1,377), मृत 26,920 (+176)
  3. रशिया – कोरोनाबाधित 2,32,243 (+10,899), मृत 2,116 (+107)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,26,463 (+3,403), मृत 32,692 (+627)
  5. इटली – कोरोनाबाधित 2,21,216 (+1,402), मृत 30,911 (+172)
  6. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,78,225 (+802), मृत 26,991 (+348)
  7. ब्राझील- कोरोनाबाधित 1,77,602 (+8,459), मृत 12,404 (+779)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,73,171 (+595), मृत 7,738 (+77)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,41,475 (+1,704), मृत 3,894 (+53)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,10,767 (+1,481), मृत 6,733 (+48)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,919 (+1), मृत 4,633 (+0)
  12. भारत – कोरोनाबाधित 74,292 (+3,524) , मृत 2,415 (+121)
  13. पेरू –  कोरोनाबाधित 72,059 (+3,237) , मृत 2,057 (+96) 
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 71,157 (+1,176), मृत 5,169 (+176)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 53,779 (+330), मृत 8,761 (+54)
  16. नेदरलँड – कोरोनाबाधित 42,984 (+196), मृत 5,510 (+54)
  17. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 42,925 (+1,911) मृत 264 (+9) 
  18. मेक्सिको – कोरोनाबाधित 36,327 (+1,305), मृत 3,573 (+108)
  19. पाकिस्तान – कोरोनाबाधित 32,674 (+1,733), मृत 724 (+57)
  20. चिली – कोरोनाबाधित 31,721 (+1,658), मृत 335 (+12)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.