Pimpri News: कोरोनाबाधित नवजात बालकांसाठी वायसीएमएच ठरले वरदान

11 बालक कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात मागील सात महिन्यात 255  कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली. जन्मलेल्या नवजात शिंशूंपैकी 11 नवजात बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.  बालरोग विभागातील सर्व डॉक्टरांच्या यशस्वी उपचारानंतर  11 बालकांनी कोरोनाला हरविले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित नवजात बालकांसाठी वायसीएम रुग्णालय हे वरदनाच ठरले आहे.

कोरोनाच्या सात महिन्यांच्या काळात वायसीएम रुग्णालयात 1329  महिलांची प्रसूती झाली आहे. यापैकी 255 महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. जन्मलेल्या नवजात शिंशूंपैकी 11 नवजात बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातील 9 जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे होती. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांनी कोरोनावर मात केली. पंरतु, यातील दोन जणांना गंभीर लक्षणे होती. त्यांना कोरोनामधून न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्यांना आँक्सिजन लावला होता. डॉक्टरांच्या यशस्वी उपचारानंतर या त्यांनीही कोरोनावर मात केली.

एप्रिलपासून वायसीएममध्ये कोरोनाबाधित असलेल्या नवजात बालकांवरती उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना काळात जन्मलेल्या प्रत्येक शिशूची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. जन्मलेल्या प्रत्येक शिशूला जन्म झाल्यावर आईचे दूध देण्यात आले आहे. कारण आईच्या दूधातून शिशूची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनाबाधित महिलेची प्रसूती झाली म्हणजे जन्मलेले शिशू हे कोरोना पॉझिव्ह असते. असे नाही. शिशूचा आणि आईचा संपर्क जास्त झाला. तर, शिशूला कोरोनाची लागण होते. असे डॉक्टरांच्या निरीक्षणातून आढळून आले आहे.  जन्मलेल्या शिशूंपैकी एकाही शिशूचा आता पर्यंत मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे 255  कोरोनाबाधित महिलांची प्रसूती झाली. त्यातील फक्त 11 शिंशूना कोरोनाची लागण झाली. त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.