Nigdi : कंपनीची 18 लाख 25 हजारांची फसवणूक, सलून चालक महिलेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – लॅकमे लिव्हर कंपनीसोबत भागीदारीत सलून व्यवसाय सुरु करून कंपनीकडून 18 लाख 25 हजार रुपये घेतले. सलून मधील मोबदला तसेच घेतलेली रक्कम परत न करता कंपनीची फसवणूक केली. याबाबत सलून चालक महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिभा प्रवीण वाघ (वय 35, रा. नवी मुंबई) यांनी याबाबत बुधवारी (दि. 11) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी काजळ कैलास भोसले (रा. केशवनगर, चिंचवड) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 10 जून 2019 पासून 11 नोव्हेंबर 2020 या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडला आहे. आरोपी काजल हिने लॅकमे लिव्हर कंपनीसोबत भागीदारीत सलून व्यवसाय सुरु केला. त्यासाठी कंपनीकडून तिने 18 लाख 25 हजार रुपये घेतले. त्यानंतर ग्राहकांकडून येणारा मोबदला दुकानाच्या खात्यावर जमा न करता तो पतीच्या खात्यावर जमा केला. तसेच कंपनीला मोबदला आणि कंपनीकडून घेतलेले पैसे परत करण्यात टाळाटाळ केली. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.