Yerwada News: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत स्लॅबचा लोखंडी सांगाडा कोसळून पाच मजुरांचा मृत्यू तर आठ जखमी

एमपीसी न्यूज – येरवड्याच्या शास्त्रीनगर भागातील लेन नंबर आठमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत स्लॅबचा लोखंडी सांगाडा पडून झालेल्या भीषण अपघातात पाच बांधकाम मजुरांचा मृत्यू झाला तर आठ ते दहा मजूर जखमी झाले. आज (गुरुवारी) रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून शोधकार्य व मदतकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. जखमी मजुरांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पाच मृतदेह हाती लागले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.