Wakad News : वाकड, विनोदवस्ती, थेरगाव येथील युवा कार्यकर्त्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज – वाकड, विनोदवस्ती, थेरगाव येथील युवा कार्यकर्त्यांनी आज (बुधवारी) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. युवा कार्यकर्ते शिवसेनेला पसंती देत असून युवा सेना अधिक बळकट होत आहे. महापालिका निवडणुकीत युवा सैनिकांनी पक्षाचे नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.

ओंकार विनोदे, निरंजन विनोदे, प्रकाश जांभूळकर ,तुषार विनोदे, प्रसाद विनोदे, पृथ्वीराज चिंचवडे पाटील ,सुरज बारणे, अजय बारणे, आकाश बारणे, विशाल बोरकर, मंगेश पाडाळे, ओंकार नेवाळे, सिद्धेश पवार या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार बारणे यांनी सर्वांच्या हातावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. पिंपरी- चिंचवड युवा सेना अधिकारी विश्वजीत बारणे, बाळासाहेब वाल्हेकर यावेळी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर युवा कार्यकर्त्यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळेच युवा कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. युवा सैनिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहचवावेत. लोकांमध्ये मिळून काम करावे. त्यांच्या अडी-अडचणींना धावून जावे. महापालिकेतील सत्ताधा-यांची चुकीच्या कामांचा जनतेच्या दरबारात पंचनामा करावा”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.