Yuvraj Singh to Make Team India Comeback : अष्टपैलू युवराज सिंग पुन्हा मैदानावर उतरणार, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने लवकरच मैदानात उतरणार असल्याचे सूतोवाच केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे. पण, तो कोणत्या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. याचा खुलासा त्याने केलेला नाही.

युवराजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून इंग्लंडविरुद्ध खेळलेला सामन्याचा व्हिडीओ शेअर केला असून, ‘देव तुमच्या ध्येयापर्यंचा रस्ता ठरवत असतो. चाहत्यांच्या विनंतीवरून मी फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मैदानात उतरत आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेसाठी धन्यवाद. ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचे प्रेम नेहमी असेच ठेवा आणि हेच खऱ्या चाहत्याचे लक्षण आहे.’ असे कॅप्शन दिले आहे.

युवराज सिंगने भारतीय संघासाठी खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये 1,900 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8,701 आणि T20 क्रिकेटमध्ये 1,177 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत कसोटी क्रिकेटमध्ये 9, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 111 आणि T20 ध्ये 28 बळी घेतले आहेत. 2019 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.