Corona Update :राज्यातील ‘या’ नेत्यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज:  राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून अधिवेशनाच्या पाच दिवसांच्या काळात 10 मंत्री आणि 20 पेक्षा अधिक आमदार कोरोना बाधित झाल्याची  माहिती  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह 22 प्रमुख नेत्यांना कोरोना संसर्ग झाला आहे.

या नेत्यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या नेत्यांमध्ये भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदींचा समावेश आहे.

पंकजा मुंडे

माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या त्या आपल्या मुंबईतील घरीच क्वारंटाईन झाल्या असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली. सुळे म्हणल्या, “”कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.”

राधाकृष्ण विखे पाटील 
“आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व.”, असे ट्विट करत विखे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली.

बाळासाहेब थोरात
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी  ट्विटरवरून माहिती दिली की, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतीही लक्षणं नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.”

यशोमती ठाकूर 

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विटरवरून माहिती दिली कि, “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.”

वर्षा गायकवाड
राज्याच्या] शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षण असून त्यांनी स्वतःला विलगीकरण करून घेतल्याची माहिती ट्विटरवर दिली आहे.

प्राजक्त तनपुरे 
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. “आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.