Maharashtra Corona Update : राज्यात आज 10,792 कोरोना रुग्णांची वाढ 

10,792 new corona patients in State today, 309 deaths.

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात राज्यात 10,792 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, नवीन 10,461 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात 10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या काळात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 70.72 टक्क्यांवरुन 82.76 टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 15 लाख 28 हजार 226 एवढी झाली आहे. त्यापैकी 12 लाख 66 हजार 240 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2 लाख 21 हजार 174 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 309 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा 40 हजार 349 एवढा झाला आहे.

10 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत प्रतिदिन चाचण्यांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. परिणामी 10 सप्टेंबर रोजी असणारा पॉझिटिव्हीटीचा दर हा 24.60 टक्क्यांवरून 10 ऑक्टोबर रोजी 15.06 टक्क्यावर आला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 76 लाख 43 हजार 584 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 28 हजार 226 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 10 हजार 783 जण होमक्वारंटाईन आहेत तर, 24 हजार 726 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.