BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बरकत याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी असे तीन गुन्हे सांगवी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. याच्यावर यापूर्वी देखील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरीही त्याच्यामध्ये बदल झाला नाही. त्याचा गुन्ह्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग, पोलीस कर्मचारी शिमोन चांदेकर, नाना झेंडे, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3