Pimpri : मोशीमधील 19 वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा; शहरातील कोरोना बधितांची संख्या 85

एमपीसी न्यूज – मोशी येथील एका 19 वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. तरुणीचा अहवाल आज, रविवारी (दि. 26) सकाळी आला आहे. आता पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बधितांची संख्या 85 एवढी झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

मोशी, दिघी येथील दोन जणांचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रविवारी आणखी एका तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सलग एकाच परिसरातील नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने मोशी परिसरात काळजीचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड शहराला सील करण्यात आले आहे.

आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात 85 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 24 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर चार जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. यामध्ये एक रुग्ण शहराच्या बाहेरचा रहिवासी होता. आता 9 जणांवर पुण्यात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.