India Corona Update : मागील 24 तासांत 22,274 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 95.77 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – भारतात मागील 24 तासांत 22 हजार 274 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी आजवर 97 लाख 40 हजार 108 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस सुधारत असून ते सध्या 95.77 टक्क्यांवर पोहोचलं आहे. 

मागील 24 तासांत देशभरात 22 हजार 272 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 01 लाख 69 हजार 118 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 2 लाख 81 हजार 667 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 16 कोटी 71 लाख 59 हजार 289 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 53 हजार 527 नमूने शुक्रवारी (दि.25) तपासण्यात आले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 251 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 लाख 47 हजार 343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.