Pune Police News : पुणे पोलीस दलातील 262 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यातील कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय वाढ होत आहे. मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी हा विषाणू अधिक वेगाने पसरू लागला आहे. पुण्या मुंबईसारख्या शहरात तर रुग्ण संख्या दुपटीने वाढली आहे.

अशातच आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे शहर पोलिस दलातील 262 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने पोलिसांसह नागरिकही चिंतित झाले आहेत. 

31 डिसेंबर रोजी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच हजाराहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. होय या कार्यक्रमानंतर पुणे शहर पोलीस दलातील जवळपास सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली.

यामध्ये आतापर्यंत तब्बल 262 कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये 225 कर्मचारी तर 37 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.