India Corona Update : 24 तासांत 1.68 लाख कोरोना रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 8.21 लाखांवर

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 68 हजार 063 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 10.64 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली असून. सध्या देशात 8.21 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 58 लाख 75 हजार 790 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 45 लाख 172 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 69 हजार 959 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या देशात 8 लाख 21 हजार 446 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 277 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 84 हजार 213 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 69.31 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 152.91 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

ओमायक्रॉन अपडेट

देशातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 461 एवढी झाली आहे. त्यापैकी 1,711 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. सध्या 2,750 ॲक्टिव्ह ओमायक्रॉन बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.