Pune News : नवले पुलाजवळ ट्रकची दुचाकीला धडक, ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या नवले पुलावर आज सकाळी पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.

मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विजय रंगनाथ कुलकर्णी (वय : 70 रा. ऑरा सोसायटी, निखिल गार्डन जवळ, वडगांव बुद्रुक, पुणे) अशी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विजय कुलकर्णी हे पूजेचे साहित्य घेऊन नवले पुलाकडून कात्रजच्या दिशेने दुचाकीने जात होते. यादरम्यान बोअरवेल ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्याच ट्रकखाली चिरडला गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना अण्णा वडेवाले हॉटेल समोर घडली. अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.