Bavdhan Crime News : पोटाला तलवार, गळ्याला चाकू लावून 45 वर्षीय इसमाला लुटले

एमपीसी न्यूज – पोटाला तलवार, गळ्याला चाकू लावून 45 वर्षीय इसमाला रात्रीच्या वेळेस लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. चेलाराम हॉस्पिटल रोडवर बावधन येथे गुरुवारी (दि.16) रात्री दीड वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लच्छाराम कानाराम चौधरी (वय 45, रा. चेलाराम हॉस्पिटलजवळ, बावधन) यांनी शुक्रवारी (दि.17) बावधन पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी (दि.16) चेलाराम हॉस्पिटल रोडवरुन रात्री दीडच्या सुमारास पायी चालत जात असताना, अंधाराचा फायदा घेत तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी चौधरी यांच्या पोटाला तलवार, गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल, चेकबुक आणि इतर कागदपत्रे चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.