India Corona Update : गेल्या 24 तासांत देशभरात 45,903 नवे रुग्ण, 490 मृत्यू

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 45 हजार 903 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 85 लाख 53 हजार 657 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासांत 490 रुग्ण दगावले आहेत यासह देशातील कोरोना मृतांची संख्या 1 लाख 26 हजार 611 एवढी झाली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या
79 लाख 17 हजार 373 एवढी झाली आहे. त्यापैकी 48 हजार 405 रुग्ण गेल्या 24 तासांत बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 92 टक्क्यांच्या पुढे आहे. देशात सध्या 5 लाख 09 हजार 673 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

देशात आतापर्यंत 11 कोटी 85 लाख 72 हजार 192 नमूणे तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 35 हजार 401 नमूणे रविवारी (दि.8) तपासण्यात आले आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक 97 हजार 296 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 81 हजार 940, दिल्ली 41 हजार 857 तर पश्चिम बंगाल मध्ये 34 हजार 566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.