Chikhali Crime News : माहेरहून रेशन, पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ; दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देण्यापूर्वीच केले तिसरे लग्न

एमपीसी न्यूज – माहेरहून रेशन आणण्याची तसेच पैशांबाबत मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार 11 मे 2004 ते 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत दांडेकर पूल, पुणे येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने नातेवाईकांकडे आल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पती कैलास रामसंभू उपाध्ये (वय 42, रा. दांडेकर पूल, पुणे), दीर प्रकाश रामसंभू उपाध्ये (वय 45), भाऊ अतुल गुरव (वय 27), मामा बाळू क्षीरसागर (वय 47) आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास आणि फिर्यादी महिला यांचा दुसरा विवाह झाला आहे. फिर्यादी सासरी नांदत असताना आरोपीने वारंवार पैशांची मागणी करून व घरगुती कारणावरून, वाईट वाईट शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केली. माहेरहून पैसे व रेशन आण म्हणून विवाहितेला मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांना घटस्फोट न देता आरोपीने तिसरे लग्न केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.