India Corona Update : 24 तासांत 9,419 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 8,251 जण कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 9 हजार 419 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, 8 हजार 251 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 46 लाख 66 हजार 241 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 97 हजार 388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्या 94 हजार 742 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 159 रुग्ण दगावले असून, देशात आजवर 4 लाख 74 हजार 111 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.37 टक्के एवढा झाला आहे.

देशात आतापर्यंत 65.19 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच, कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 130.39 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.