Bavdhan : एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी अवघ्या दहा मिनिटांत चोरली

एमपीसी न्यूज – एटीएमसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत चोरून नेली. ही घटना बावधन येथे घडली.

राजू बबन पवार (वय 52, रा. सुतारवाडी, पाषाण, पुणे) यांनी शुक्रवारी (दि. 1) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी पवार यांनी आपली एमएच-12-सीसी-3214 ही दहा हजार रुपयांची दुचाकी पाषाण रोड, बावधन येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएमसमोर पार्क केली. अवघ्या दहा मिनिटांमध्ये ते परत आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.