Pune : भामा-आसखेडचे पाणी द्या, मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज – भामा-असखेडचे पाणी मिळण्यासाठी आज महापालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन केले. पाणी कधी मिळणार? हात जोडून विनंती आम्हाला पाणी द्या, आशा घोषणांचे फ्लेक्स झळकविण्यात आले.

विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर प्रशांत जगताप, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक आदित्य माळवे, महेंद्र पठारे, अविनाश साळवे आंदोलनात सहभागी झाले होते.

लोहगाव, धानोरी, कळस भागात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे नगरसेवक बापूराव करणे गुरुजी म्हणाले. प्यायला पाणी नसल्याचे नगरसेवक भैय्या जाधव यांनी सांगितले.

आम्ही पाणी देतो म्हणून लोकांना किती काळ फसवायचे?, असा सवाल नगरसेवक बॉबी टिंगरे यांनी उपस्थित केला. तर, भामा – आसखेड योजनेत भूसंपादन करताना कोणकोण दलाली करीत आहे, याची चौकशी करा, त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.