Mumbai : अजित पवार यांनी घेतली चौथ्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार दोनदा उपमुख्यमंत्री होते. पाण्यावरुन वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आता 2019 च्या विधानसभेचे निकाल लागल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु, तीन दिवसातच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

आता महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  अजित पवार चौथ्यावेळी उपमुख्यमंत्री झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.