Chikhali : महिलेच्या छळप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेच्या छळप्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिखली येथे घडली.

याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती, सासू, सासरे, नणंद, भाचा आणि अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना एप्रिल 2019 ते 27 डिसेंबर 2019 या कालावधीत घडली. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी महिलेला वेळोवेळी शिवीगाळ करत हाताने मारून वाईट वागणूक दिली. तसेच फिर्यादी महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला.

संशयित आरोपी पतीने फिर्यादी महिलेचा छळ केला असल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.