Chikhali : कडीकोयंडा तोडून चिखलीत भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख 39 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 11) दुपारी एक ते रात्री आठ या कालावधीत घरकुल, चिखली येथे घडली.

मुक्ता भगवान जाधव (वय 45, रा. घरकुल, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर शनिवारी दुपारी एक ते रात्री आठ या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी घराच्या सेफ्टी डोअरचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन लाख 39 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.