Hinjawadi : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला
एमपीसी न्यूज – घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 8) सकाळी दिनेश सुतार चाळ बावधन येथे उघडकीस आली. संचार बंदीच्या काळात ही चोरट्यांचा मुक्तसंचार होत असून चोरटे घरासमोरील वाहने देखील चोरी करीत असल्याने शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अजय प्रकाश गोंधळी (वय 23, रा. भुढेवस्ती, बावधन बु., ता. मुळशी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 37 / एक्स 4073) सात एप्रिल रोजी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार आठ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.