Pune : ससूनमध्ये आणखी दोन बळी, एकूण 66 मृत्यू; नवे 20 पॉझिटिव्ह, 7 जणांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज : पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना दररोज कोरोनाबाधितांचा मृत्यूही होत आहे. आज ( शनिवारी ) आणखी दोन रुग्णांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे एकट्या ससूनमधील कोरोना मृतांची संख्या 66 झाली आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, 20 नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बी. जे. शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे कोविड नोडल ऑफिसर यांनी ही माहिती दिली. देशभरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. कोरोना टेस्टची संख्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सरकाकडून सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे शहरात कोरोना कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पुणे शहरात एकट्या ससून रुग्णालयात कोरोना मृतांची संख्या 66 झाली. आज ( शनिवारी ) आणखी दोन रुग्णांनाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. तर, 20 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
ससून रुग्णालयात आज 167 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी २० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. सध्या ससूनमध्ये 101 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 40 संशयित रुग्णही येथे दाखल आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या २३ रुग्णांवर व्हेंटिलेटरशिवाय, तर चौघांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.