Pimpri: चऱ्होली, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी, थेरगाव, रुपीनगरचे टेन्शन कायम ! 10 नवीन रुग्ण सापडले

दिवसभरात 13 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली, रुपीनगर, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी आणि थेरगावातील 10 जणांचे तर पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या दोघांचे असे 12 जणांचे रिपोर्ट आज (शनिवारी) सायंकाळी पॉझिटीव्ह आले.  तर, सकाळीच तळवडेतील एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 13 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने शुक्रवारी (दि. 8) 104 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत.

च-होली, रुपीनगर, ताम्हाणेवस्ती, थेरगाव आणि काळेवाडीतील दहा जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 58, 63, 31, 60, 40, 32 आणि 83 वर्षीय सात पुरुषांचे आणि सहा महिन्याच्या मुलीसह 25 आणि 45 वर्षीय महिलेचे अशा शहरातील 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

तर, पुण्यातील नाना पेठ, खडकीतील 39 वर्षीय पुरुष आणि 24 वर्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिका रुग्णालयात 77 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील दहा रुग्णांवर महापालिका हद्दीबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशा 183 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 77 जण कोरोनामुक्त झाले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल !
# दाखल झालेले संशयित रुग्ण – 160
#  पॉझिटीव्ह रुग्ण – 14
# निगेटीव्ह रुग्ण – 96
# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 160
# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 245
# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 97
# आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 183
#  सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 77
#  शहरातील कोरोना बाधित दहा रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 7
# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 77
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 21548
# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 65159

शहरातील हा परिसर सील !

काळेवाडी, थेरगाव, च-होली, रुपीनगर, परिसरात आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गुरुविहार (गुरुविहार कॉलनीगार्डन-महादेव मंदिर-पुणे-नाशिक हायवे-एसबीआय एटीएम- ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालय-भोसरी रोलरकेटर रिंग), लांडगेनगर, भोसरी ( ऑक्का गणेश कॉर्नर-स्पेरोनी इंडिया प्रा.लि-पुणे नाशिक हायवे-हॉटेल क्लाऊड 9- स्वस्तीक ज्वेलर्स) तापकीर चौक काळेवाडी (हॉटेल गुरुदत्त-एसबीआय एटीएम-शिवसेना कार्यालया समोर-हनुमान सुपर मार्केट-ओंकार लॅमिनेट््स- बेबीज इंग्लिश स्कूल-तुळजाभवानी मंदिर-बेंगलोर अय्यंगार बेकरी-हॉटेल गुरुदत्त), दत्तनगर थेरगाव (पिंक लिली सोसायटी-पवना नदी-गंगा आशियाना मागील मोकळी जागा, आशियाना आय, के बिल्डींग), कस्पटेवस्ती वाकड ( सोनिगीरा केसर बिल्डींग 7- एॅलियन्स हॉटेल समोर-कस्पटे वस्ती रोड-छत्रपती रोड-पंजाब नॅशनल बँक) हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.