Pimpri: वाहन चोरीचे सत्र सुरूच; चाकण, वाकड, तळेगाव येथून तीन दुचाकी चोरीला

Pimpri: Three two-wheelers were stolen from Chakan, Wakad, Talegaon पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून चाकण, वाकड, तळेगाव येथून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच असून चाकण, वाकड, तळेगाव येथून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. बुधवारी (दि.8) याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुचाकी चोरीची पहिली घटना 28 ते 29 मे दरम्यान आदर्श नगर, काळेवाडी, वाकड येथे घडली. याप्रकरणी अमृता विजय विटकर (वय 27, रा. शिवशक्ती कॉलनी, आदर्श नगर, काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमृता यांनी 30,000 किंमतीची दुचाकी (एमएच 12 आरएच 6840) ही घरासमोर लॉक करून उभी केली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची दुसरी घटना 7 ते 8 जुलै दरम्यान भेगडे आळी, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे येथे घडली. संजय एकनाथ गरुड (वय 50, रा. भेगडे आळी, शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय यांनी आपली (एमएच 14 एफडब्लू 9829) ही 20,000 किंमतीची दुचाकी घरासमोर लॉक करून पार्क केली असता कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

दुचाकी चोरीची तिसरी घटना 26 ते 27 जून दरम्यान आंबेठाण, चाकण येथे घडली. काळुराम दामोदर घाडगे (वय 42, रा.आंबेठाण, चाकण ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी काळुराम यांची (एमएच 14 एके 6837) ही 6,000 किंमतीची दुचाकी घरासमोर लॉक करून पार्क केली होती. दरम्यान, चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.