Pune News : पीएमपीएमएलच्या तिजोरीत एकाच दिवसात 50 लाख रुपयांचा भरणा !

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला (पीएमपीएमएल) लॉकडाऊननंतर प्रथमच एका दिवसात 50 लाखाचा महसूल मिळाला आहे. यंदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली होती. त्यामुळे या दिवशी हा महसूल मिळाला.

पीएमपीएमएलकडून सध्या पुणे शहर आणि उपनगराच्या विविध मार्गांवर 1 हजार 72 बसेस प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या आहेत. पुणेकर देखील या बस सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत.

प्रत्येकी 5 किलोमीटरला 5 रुपये तिकीट दर आणि प्रत्येक पाच मिनीटाला एक बस या अटल योजनेला देखील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परिणामी प्रवासी संख्या देखील दिवसेंदिवस वाढत असल्याने महसुलात विक्रमी वाढ झाली आहे.

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, पीएमपीएमएलकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरात बससेवा सुरू केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शंभर टक्के क्षमतेने बससेवा सुरू करणार आहोत. लवकरच 15 लाख प्रवासी उद्दिष्ट समोर ठेऊन 2 कोटी रुपयांचा भरणा कसा प्राप्त होईल यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.