एमपीसी न्यूज – पुण्यात आज 6679 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 48 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 4628 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पुणे परिसरातील 48 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1045 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 4956 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.
आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3 लाख 29 हजार 661 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 52476 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5748 रुग्णांचा मृत्यू झाला.
तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.