Pimpri News : स्वयंपाक्याने पळवले पगारासाठी ठेवलेले साठ लाख रुपये

एमपीसी न्यूज – कंपनीच्या वतीने जेवण बनवण्यासाठी ठेवलेल्या स्वयंपाकी व्यक्तीने कंपनीतील कामगारांच्या पगारासाठी ठेवलेले साठ लाख रुपये लाॅकर मधून चोरून नेले. ही घटना महिंद्रा अॅटीया, नेहरूनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 28) दुपारी घडली.

अनोदकुमार राजकुमार यादव (वय 28, रा. कुमाडांडा, सदरापुर, बाराबंकी, उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे याबाबत अजित संजयकुमार राजहंस (वय 31, रा. महिंद्रा अॅटीया, नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनी स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन डिव्हिजन मध्ये नोकरी करतात. फिर्यादी आणि त्यांचे इतर तीन सहकारी इंजिनिअर यांच्यासाठी कंपनीमार्फत जेवण बनविण्यासाठी आरोपी यादव याला स्वयंपाकी म्हणून नेमले होते.

आरोपी स्वयंपाकी फिर्यादी यांच्याच फ्लॅटवर राहत असे. दरम्यान फिर्यादी यांनी कंपनीतील कामगारांच्या पगारासाठीचे 60 लाख रुपये त्यांच्या बेडरूममध्ये लाकडी कपाटात लॉकरमध्ये ठेवले होते. बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपीने बनावट चावीने कपाट आणि लाॅकर उघडून 60 लाख रुपये चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87b52183addf61c8',t:'MTcxNDI4NzE2My4xMTUwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();