Pimpri News : राज्यपालांवर गुन्हा दाखल करा, शिवप्रेमींची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – अखंड महाराष्ट्राचे (Pimpri News) आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवप्रेमी सदाशिव तळेकर यांनी केली.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. देशाला दिशा दिली. अशा थोर महापुरुषाबद्दल भगतसिंह कोश्यारी यांनी जे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यामुळे अखंड महाराष्ट्रातील जनता व शिवप्रेमी दुखावले गेले आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.

PCMC: जुनी प्रभाग रचना कायम ठेवून निवडणूक घ्या, अन्यथा….

महापुरुषांबद्दल अवमान कार्य शब्द उच्चारणे, बोलणे (Pimpri News) हा गुन्हा आहे. त्यामुळे कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा. यापूर्वीही कोश्यारी यांनी वेगवेगळी वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेची मन दुखावली आहेत. अजून किती दिवस महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार आहे, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.