Hinjewadi: वाहनाच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव अवजड वाहनामुळे अपघात झाला. यात दुचाकीस्वार (Hinjewadi)खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेले. यात चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माण रस्त्यावर गोदरेज व्हीटीपी प्रवेशव्दारासमोर गुरुवारी (दि. 2) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. 
गजानन उर्फ गजेंद्र हनुमंत वैद्य ( वय 34, रा. बीड), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे (Hinjewadi)नाव आहे. सनी हनुमंत धुमाळ (वय29, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. 3) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अवजड वाहनाच्या अनोळखी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सनी आणि त्यांचा मित्र गजानन हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगात अवजड वाहन आले. वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन उजव्या बाजूला घेतल्याने फिर्यादी सनी हे दुचाकीसह खाली पडले. यात त्यांचा मित्र गजानन यांच्या डोक्यावरून अवजड वाहनाचे उजव्या बाजूचे पाठीमागील चाक गेल्याने गजानन यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.