Chikhali Crime News : कारच्या धडकेत 63 वर्षीय जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज – रस्ता क्रॉस करणा-या 63 वर्षीय जेष्ठ नागरिकांचा कारच्या धडकेत मृत्यू झाला आहे. स्पाईन रोड, शरदनगर, चिखली याठिकाणी गुरुवारी (दि.19) हा अपघात झाला. 

सुरेश पुतू म्हाळसेकर (वय 63) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी म्हाळसेकर यांची मुलगी प्रियंका सुरेश म्हाळसेकर यांनी चीखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश पुतू म्हाळसेकर हे रस्ता क्रॉस करत असताना आरोपीने आपली कार (एम एच 14 एके 4956) भरधाव वेगाने चालवून त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत म्हाळसेकर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.