Pune News : रविवार पेठेतून सराफाची पाऊण किलो सोन्याची बॅग पळवली

एमपीसी न्यूज : शहरातील रविवार पेठेतून एका सराफा व्यावसायिकाची पाऊण किलो सोने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने पळवली. येन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत माळी नामक सराफी व्यवसायिक आहेत. त्यांचे दुकान आहे. दरम्यान ते खरेदीसाठी आले होते. त्यांनी 800 ग्रॅम सोने खरेदी केले होते. त्यांची कार होती. कारमध्ये ते सोने त्यांनी एका बॅगेत ठेवले होते. यादरम्यान ते गुजराती शाळेजवळ कार उभी करून खरेदी करण्यासाठी गेले होते.

यावेळी चोरटे त्याठिकाणी आले. त्यांनी माळी यांना गाडीतून ऑइल गळत असल्याची माहिती दिली. तसेच त्यांनी कारमधून उतरून पाहण्यास सुरुवात केली. त्याच वेळी चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून पाऊण किलो सोने असणारी बॅग लंपास केली. काही क्षणात त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपींचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेच्या पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.