India Corona Update : मागील 24 तासांत 20,036 नवे रुग्ण, 256 जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 20 हजार 36 नवे रुग्ण आढळले आहेत तर, 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 02 लाख 86 हजार 710 एवढी झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 23 हजार 181 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशभरात 98 लाख 83 हजार 461 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजघडीला देशात 2 लाख 54 हजार 254 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 17 कोटी 31 लाख 11 हजार 694 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 10 लाख 62 हजार 420 नमूने गुरुवारी (दि.31) तपासण्यात आले आहेत.

 

देशभरात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 994 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मागील 24 तासांत 256 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.44 टक्के एवढा आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.07 टक्के एवढं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापरासाठी गुरुवारी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती. भारतात दोन जानेवारीपासून सर्व राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची ड्राय रन अर्थात रंगीत तालीम घेण्याबाबत केंद्र सरकारची तयारी सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.