Maval News : जागतिक महिला दिनानिमित्त सांगवडे येथे राष्ट्रीय सेवा योजने मार्फत महिलांच्या जीवनावर आधारित पथनाट्य

एमपीसी न्यूज-  सांगवडे येथे ग्रामपंचायत मार्फत प्रथमतःच जागतिक महिला दिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिलांसाठी विशेष  ग्रामसभेचेआयोजन करण्यात आलेले होते, व महिलांचा विशेष असा सन्मान देखील करण्यात आला. तसेच महिलांना ग्रामपंचायत मार्फत कार्यक्रमाच्या  दरम्यान स्वतःच्या नावाचे 8अ दाखले वितरित करण्यात आले.

ह्या उपक्रमाचे श्रेय सांगवडे गावचे युवा सरपंच रोहन जगताप ह्यांना जाते असे मत ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केले.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क – स्मिता करंदीकर

दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना मराठवाडा फार्मसी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी  महिलांच्या जीवनावरील पथनाट्य सादर केले. ग्रामपंचायत च्या वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

Watch on Youtube: ऐका… आजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

ग्रामसभेमध्ये महिलांविषयीच्या विविध योजना व समस्यांबद्दल चर्चा झाली व  निरसरन करण्याचे आश्वासन देण्यात आले. ग्रामसभा समाप्तीनंतर सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला व केक कापून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप यांनी आलेल्या महिलांना भविष्यात असणाऱ्या विविध संधी व त्याचे लाभ कशाप्रकारे घेता येईल त्याबद्दल मार्गदर्शन केले.

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

याप्रसंगी उपसरपंच योगेश राक्षे, महिला सदस्या राजश्री राक्षे, काजल राक्षे, माया राक्षे, ललिता लीमन, अमोल मोकाशी, शाळा व्यवस्थापन समितीअध्यक्ष युवराज राक्षे,पोलीस पाटील तुषार मोकाशी तसेच गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.

Watch on Youtube: नंदी खरंच दूध पितो?… जाणून घ्या घटनेमागील शास्त्रीय कारण 

सांगवडे गावामध्ये प्रथमच असा महिला दिन साजरा केल्याने महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला, या आगळयावेगळ्या महिलादिनाचे कौतूक पंचक्रोशीतून होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.