सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Crime News : चोरट्याने बावधनमधील फ्लॅटमधून अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले

एमपीसी न्यूज –  अज्ञात चोरट्याने बावधनमधील फ्लॅटमधून अडीचलाख रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरल्याची घटना बुधवारी घडली आहे.

याबाबत महेंद्र चौधरी (वय 42 रा.फ्लॅट नंबर 301, पाटील हाइट्स, डी पॅलेस जवळ, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांची पत्नी कन्यादेवी या बाहेर गेल्या असता चोरट्याने राहत्या घराचा दरवाजा व बेडरूममधील कपाटाचा दरवाजा  घराच्या दरवाजाचा कोयंडा कशाच्या तरी साह्याने कट करून आत प्रवेश केला.बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून कपाटातील लॉकरमधील एक लाख रुपये किंमतीचे एक सोन्याचे गंठण, एक लाख रुपये किमतीचा राजस्थानी त्यावरील बिंदीच्या डिझाईनचा सोन्याचा बोर हार, 25 हजार रुपये किमतीची एक सोन्याची चेन, 20 हजार  रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, 7 हजार 500 रुपये किंमतीचा चांदीचा कंबरपट्टा असे एकूण 2.52 लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले.

spot_img
Latest news
Related news