Vadgaon Maval News : भारत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी साते येथील 75 युवकांनी रक्तदान करून दिली अनोखी सलामी

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : वडगाव मावळ जवळील साते येथे आज दि.10 रोजी प्रभू श्री राम नवमीचे  औचित्य साधून आणि छत्ररपती श्री संभाजी महाराज बलिदान मासांच्या समाप्तीनिमित्त गावातील व  पंचक्रोशीतील तरुण-तरुणींनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. तसेच 75 तरुणांनी व तरुणींनी केलेल्या  रक्तदानामुळे भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिम्मित अनोखी सलामी देण्यात आली.

श्रीराम नवमी निम्मित मावळ मध्ये विविध ठिकाणी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे साते येथील तरुणांनी एकत्र येत अनोख्यापद्धतीने लोकसहभागातून रक्तदान  शिबिराचे आयोजन  करण्यात आले. गावातील तरुण तरुणींनी छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासांचे महिनाभर व्रत केले होते.

रक्तदान शिबिराचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मावळ विभाग, बजरंग दल मावळ प्रखंड व समस्त ग्रामस्थ साते यांनी केले. पिंपरी चिंचवड रक्तपेढी च्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर पार पडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.