Jadhavwadi News : अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले

एमपीसी न्यूज – एका अज्ञान इसमाने अल्पवयीन मुलीस राहत्या घरातुन पळवून नेल्याची घटना शहरात घडली आहे. जाधववाडी परिसरात शनिवारी (दि. 9) सकाळी 11 वा. ही घटना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी येथील राहत्या घरातून फिर्यादी यांच्या 12 वर्ष 9 महिणे वय असलेल्या मुलीस एका अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून राहत्या घरातून शनिवार दि. 9 रोजी स. 11 वा. पळवून नेले.

याविरोधात फिर्यादी यांनी चिखली पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे. आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चिखली पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.