Pune Kidnapping Case : सुटकेचा निःश्वास! अपहरण झालेला डुग्गू अखेर सापडला, आरोपी मात्र मोकाटच

एमपीसी न्यूज – पुण्यातल्या डॉ. सतीश चव्हाण यांचा अपहरण झालेला लहानगा अखेर सापडला. स्वर्णव (डुग्गू),वय वर्ष 4, असं मुलाचं नाव आहे. बालेवाडीमधून त्याचे अपहरण झाले होते. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलाला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास 300 ते साडेतीनशे पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलाचा शोध घेत होते.

अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले. चतु:शृंगी पोलिसात याबाबत तक्रार होती. कशासाठी अपहरण केले याचा तपास पोलीस करीत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आलं असून कोणी अपहरण केलं आणि का केलं, हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

पुण्याच्या बालेवाडी परिसरातून अकरा जानेवारी रोजी चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण झाले. त्यानंतर पोलिसांसह कुटुंबीय आणि राजकीय पुढाऱ्यांनी देखील हालचाली केल्या. मात्र चिमुरड्याचा शोध लागला नाही. तब्बल आठ दिवसानंतर आज बुधवारी (दि. 19) पुनावळे येथे तो सुखरूप सापडला आहे.

स्वर्णव उर्फ डुग्गू सतीश चव्हाण (वय 4) असे या मुलाचे नाव आहे.

300 पेक्षा जास्त पोलिसांकडून तपास –

डुग्गूचे 11 जानेवारी रोजी बालेवाडी परिसरातून अज्ञातांनी अपहरण केले. याबाबत त्याच्या पालकांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ हालचाली सुरू केल्या. अनेक पातळ्यांवर चौकशी करून देखील पोलिसांना यश आले नाही. डुग्गूच्या शोधासाठी 300 पेक्षा जास्त पोलिसांकडून तपास चालू होता.

दरम्यान त्याचे वडील सतीश चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली. माझा मुलगा डूग्गू बद्दल कुठलीही माहिती नाही. मला तो सापडला का, असे विचारायला कृपया फोन करू नका. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल तर प्लीज फोन करा. ज्याने कोणी त्याला नेले मला माझा मुलगा परत द्या. फक्त एकदा फोन करा, तुम्ही मागाल ते आम्ही देऊ. प्लीज आम्हाला फोन करा, अशी विनवणी सतीश चव्हाण यांनी पोस्टमध्ये केली होती.

दरम्यान आज दुपारी पुनावळे येथे डुग्गू सापडला. तो सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचे कुणी आणि कशासाठी अपहरण केले याबाबत मात्र अजूनही तपास लागलेला नाही, मात्र डूगु सुखरूप असल्याने त्याच्या घरचे आनंदून गेले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=E3jTgxKBl8g

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.