Bhosari News: ज्येष्ठ नागरिकास स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी – अभय भोर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 25 हजार ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद आहेत. जेष्ठ नागरिक महासंघातील ज्येष्ठ नागरिकास महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी. जेणेकरून जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील, अशी मागणी छावा ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली.

भोसरी एमआयडीसी येथे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष भोर यांच्या कार्यालयात पिंपरी-चिंचवड जेष्ठ नागरिक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीला महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात 25 हजार ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद आहेत. परंतु, आजही या सर्वांना एकत्रित ठिकाणी जमण्यासाठी मोक्याची जागा मिळत नाही. गेली दहा वर्ष पाठपुरावा चालू आहे. आजही पिंपरी-चिंचवड शहरात ज्येष्ठ नागरिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. न्यायाची अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला निधी नेमका किती आणि कोणत्या कारणासाठी उपयोगात आणला जातो. याची माहिती सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना मिळत नाही. पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्योजक कायम प्रयत्नशील असतील. ज्येष्ठ नागरिकांना उद्योगाच्या कामाच्या नवीन संधी देण्यात येतील जेणेकरून त्यांचा वेळ जाईल असे, अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.

यावेळी अरुण बागडे, कार्याध्यक्ष वृषाली मरळ, चिटणीस हरिनारायण शेळके, सहचिटणीस मधुकर कसबेकर, उपाध्यक्ष शांताराम सातव, बाबुराव फुले, गजानन धमाले, बाळकृष्ण माडगूळकर आणि स्वीकृत सदस्य पंडित खरात तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.