Wakad News : पब मध्ये डान्स करत असताना महिलेशी गैरवर्तन

एमपीसी न्यूज – जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पाॅट 18 मॉल मधील पबमध्ये डान्स करत असलेल्या महिलेसोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केले. याप्रकरणी त्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली आहे. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाॅट 18 मॉल मध्ये 18 डिग्रीज रूफ टाॅप रेस्टो लॉन्च पब आहे. रविवारी रात्री पीडित महिला आणि तिचे मित्र पार्टीमध्ये डान्स करत होते. फिर्यादी या डिजेला गाणे बदलण्यास सांगत असताना आरोपी अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या मागे आला. आरोपी डीजेला म्हणाला, ‘मॅडम जो गाना बोल रही है वही बजना चाहिये रातभर’, असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.