Alandi Crime News : जबरदस्तीने महिलेवर लैंगिक आत्याचार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – रुममध्ये बोलवून जबरदस्तीने महिलेवर लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (दि.21) आळंदी, ता. खेड रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

मन्नु धिरेंद्र मलिक (रा. माऊली पार्क, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडित महिलेनं आळंदी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.23) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने फिर्यादी महिलेला पाणी घेऊन रुममध्ये बोलवले. फिर्यादी महिला पाणी घेऊन रुममध्ये आल्यावर आरोपीने दार बंद करून महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबाबत कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.