Pune News : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. यातून ही मुलगी गर्भवती राहिली. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 25 वर्षीय आरोपी आणि 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख झाली होती. आरोपीने ओळख वाढवून आणि पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फेब्रुवारी 2020 ते जुलै 2021 या काळात तिच्या सोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यामुळे ही मुलगी गर्भवती राहिली होती.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरोधात उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.