Talegaon Crime News : चोरीच्या कारचा पाठलाग करताना आरोपींकडून दोन पोलिसांवर चाकूहल्ला

एमपीसी न्यूज – चोरीला गेलेली कार दिसल्याने खंडणी विरोधी पथकाने चोरीच्या कारचा पाठलाग केला. कार सोमाटणे टोलनाक्यावर थांबली असता पोलीस कार ताब्यात घेण्यासाठी गेले. त्यावेळी दोघांनी दोन पोलिसांवर चाकूने वार करत खुनी हल्ला केला आणि आरोपी पळून गेले. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री दीड वाजता घडली.

पोलीस हवालदार एन आर काळे, पोलीस शिपाई प्रदीप गुट्टे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. प्रदीप गुट्टे यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई प्रदीप गुट्टे हे खंडणी विरोधी पथकात नेमणुकीस आहेत. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांच्यासोबत प्रदीप गुट्टे रात्रगस्तीवर चालक म्हणून कार्यरत होते. त्यांची गस्त सुरू असताना निगडी येथील सर्वेश परदेशी यांची चोरीला गेलेली कार (एम एच 14 / सी सी 3830) निगडी येथे दिसली. त्यामुळे खंडणी विरोधी पथकाने कारचा पाठलाग केला.

Car – Container Crash News : कार – कंटेनरचा भीषण अपघात, कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

कार देहूरोड मार्गे जुना पुणे-मुंबई महामार्गावरून तळेगावच्या दिशेने निघाली. खंडणी विरोधी पथकाने कारचा पाठलाग करून सोमाटणे टोलनाक्यावर कार थांबली असता तिला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चोरीची कार ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार काळे आणि पोलीस शिपाई गुट्टे गेले. कार ताब्यात घेत असताना कारमधील दोघांनी पोलिसांवर चाकूसारख्या हत्याराने प्राणघातक हल्ला केला. दोन पोलीस जखमी झाले. त्यानंतर आरोपी पळून गेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.