Pimpri News : नेहरूनगर येथील पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय  कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाच्या वतीने  नेहरूनगर येथील मोकळ्या जागेवरील  दहा हजार व भोसरी एम आय डी सी परिसरातील सुमारे चार हजार असे सुमारे चौदा हजार चौरस फूट क्षेत्रावरील अनधिकृत पत्राशेड हटविण्याची कारवाई आज करण्यात आली.

आयुक्त राजेश पाटील व अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. रस्ते व फूटपाथ तसेच मोकळ्या भूखंडावर असणारी अनधिकृत पत्राशेड हटविण्याची कारवाई महापालिकेच्या वतीने करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

नेहरूनगर येथे कचरा संकलन जवळच्या  मोकळ्या भूखंडावर सुमारे दहा हजार चौरस फूट क्षेत्रावर अनधिकृत शेड उभारण्यात आले होते. तसेच भोसरी एम आय डी सी परिसरातील बालभवन समोरील कचरा संकलन जवळ चार हजार चौरस फूट क्षेत्रावर अनधिकृत शेड उभारण्यात आले होते त्यावर आज अतिक्रमण पथकाने कारवाई केली. या मोहिमेत अतिक्रमण  निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर,बीट निरिक्षक संतोष शिरसाट,प्रसाद आल्हाट,निवृत्ती गुणवरे,महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथक प्रमुख उत्तम शेजाळ यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.