Chinchwad News : शहरात अवैधरित्या दारू विक्री करणा-या 13 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज : दिघी, चाकण, देहूरोड, चिंचवड, निगडी, चिखली आणि पिंपरी परिसरात 13 ठिकाणी पोलिसांनी अवैधरित्या दारू विक्री करणा-या 13 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून 59 हजार 823 रुपये किमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.

दिघी पोलिसांनी भारत माता नगर येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करत गणेश नारायण करणे (वय 36, रा. भोसरी. मूळ रा. बुलढाणा)यांच्याकडून 572 रुपयांची तर कृष्णा गानबहादूर विश्वकर्मा (वय 30, रा. भोसरी) याच्याकडून एक हजार 924 रुपयांची दारू जप्त केली.

चाकण पोलिसांनी सुनीता रमेश रजपूत (वय 35, रा. वासुली फाटा सावरदरी, ता. खेड) हिच्याकडून 8 हजार 400 रुपयांची आणि कबीराज राम बिक (वय 31, रा. महाळुंगे, ता. खेड) यांच्याकडून 3 हजार 244 रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली.

देहूरोड पोलिसांनी हौसा टीट्या सिंग (वय 48, रा. गांधीनगर, देहूरोड) हिच्यावर कारवाई करत तिच्याकडून एक हजार 400 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

चिंचवड पोलिसांनी देखील एका दारू विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्याकडून एक हजार 400 रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली आहे. प्रदीप बाबुलाल गायकवाड (वय 45, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

निगडी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केल्या आहेत. मारुती गुंडाप्पा पवार (वय 48, रा. ओटास्कीम, निगडी) याच्याकडून एक हजार रुपयांचा तर विनोद पांडुरंग गायकवाड (वय 39, रा. ओटास्कीम, निगडी) याच्याकडून 156 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मधुकर मल्हारी कांबळे (वय 50, रा. ओटास्कीम, निगडी) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून 35 हजार 15 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

चिखली पोलिसांनी राकीब महिजूल शेख (रा. सोनवणे वस्ती, चिखली) याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून एक हजार 536 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला आहे.

पिंपरी पोलिसांनी भाटनगर येथे दोन तर संत तुकाराम नगर येथे एक कारवाई केली आहे. भाटनगर येथील कारवाईमध्ये वैशाली तामचीकर (वय 40, रा. भाटनगर, पिंपरी) हिच्याकडून तीन लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. पोलिसांची चाहूल लागल्याने ती पळून गेली आहे. उषा मनोज बागडे (वय 40, रा. भाटनगर, पिंपरी) हिच्याकडून एक हजार रुपयांची 20 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे. संत तुकाराम नगर येथे इकबाल सलाम तुर्की (वय 24, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी. मूळ रा. उत्तरप्रदेश) याच्यावर कारवी करत पोलिसांनी त्याच्याकडून 4 हजार 176 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.