Aditya Murder Case : लहान मुलांसाठी एक विशेष कायदा करण्याची गरज – विरोधीपक्ष नेते अजित पवार

एमपीसी न्यूज – विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी लहान मुलांसाठी एक विशेष कायदा करण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले. अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.

गव्हाणे म्हणाले, की काल (29 सप्टेंबर) संध्याकाळी विरोधीपक्ष नेते अजित पवार व शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी मृत आदित्य ओगले (Aditya Murder Case) याच्या कुटुंबियांची भेट पिंपरीतील अजमेरा- मासुळकर कॉलनी येथे घेतली. 7 वर्षीय आदित्य ओगलेचे अपहरण 8 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते व त्याचा मृतदेह 10 सप्टेंबर रोजी सापडला. त्याच्या बिल्डिंगमधील राहणाऱ्या युवकाने त्याचे अपहरण करून खून केला होता. त्याच्या मारेकरी युवकाने 20 कोटींची खंडणी मागितली होती.

गव्हाणे म्हणाले, की लहान मुलांच्या संदर्भातील गुन्हे (Aditya Murder Case) वाढत असल्याने विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी लहान मुलांसाठी एक विशेष कायदा करण्याची गरज असल्याचे सांगितले. पवार यांनी आदित्य ओगलेच्या वडिलांशी 15 मिनिटे एकटयात बोलणे केले.

New Sangavi : बदलत्या जीवनशैलीमुळे मासिक पाळी येण्याचे वय कमी होतेय – वैशाली श्रीमंडल

अजित पवार यांच्या समवेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ हेही उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.